Posts

जागेमधील फेरबदल, व्याजावर व्याज आकारणी आणि चुकीच्या फ्लॅट क्र.ची नोंदणी. : ऍड. रोहित एरंडे

 आमच्या सोसायटीमधील नवीन सभासदाने त्याच्या तळमजल्यावरच्या फ्लॅटमध्ये नूतनीकरण चालू केले. अर्ज देताना संपूर्ण घरातील नूतनीकरणाबरोबर न्हाणीघरातील व संडासमधील बदल करण्याचे सूतोवाच केले होते. प्रत्यक्षात घरातील बदल सुचवणाऱ्या वास्तूतज्ज्ञांच्या (वास्तुविशारद नव्हे) सल्ल्यानुसार काही बदल केले आहेत. त्यापैकी एक म्हणजे संडास व न्हाणीघर पूर्ण मोकळे केले असून त्याठिकाणी मुलासाठी खोली बनवली आहे. घर २बीएचके आहे. मास्टरबेडरूमला संडास व न्हाणीघर आहे. परंतु मधली जी खोली आहे त्या खोलीत न्हाणीघर व संडास नव्याने आहे जिथे मागील बाजूस पाण्याची व ड्रेनेजची लाईन मुळातच नाही (वास्तूविशारदाच्या आराखड्यानुसार) बनवलेले न्हाणीघर व संडास यासाठी मागील बाजूस स्वतःच्या खर्चाने ड्रेनेज लाइन टाकून ती मुख्य लाइनला जोडणार आहे. नवीन खिडकी बनवणे, मास्टरबेडरूमला मागील बाजूस पूर्वीच्या सभासदाने जो दरवाजा बनवला तो तसाच ठेवून आणखी एक सेफ्टी डोअर बनवणे जो सोसायटीच्या जागेत आहे, घरात आलेल्या विद्युत केबलऐवजी दुसरीकडूनच केबल घेणे, जिन्याच्या भागातील जागेचा नूतनीकरणासाठी वापर करणे, एखादा सभासदाने असे करणे हे कायद्याला धरून आ...